आर्ची आणि परश्या झाले मनसे चित्रपट सेनेचे सदस्य
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीत सर्वात लोकप्रिय ठरलेल्या सैराट या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू,अभिनेता आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आज मनसे चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले.
देशात आणि परदेशात धुमाकूळ घालणारा आणि मराठी चित्रपट सृष्टीत रेकाॅर्ड ब्रेक करणा-या सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री रिंकू राजगुरू व अभिनेता आकाश ठोसर यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या उपस्थितीत मनसे चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले.नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांनी केवळ मनसे चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले असून,याच्याशी राजकीय संबंध जोडू नका,जसे इतर कलाकार सदस्य झाले त्या प्रमाणेच यांनी सदस्यत्व स्वीकारले आहे.याबद्दल मी त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले.