तक्रार निवारणासाठी १८ सप्टेंबरला पेन्शन अदालत

तक्रार निवारणासाठी १८ सप्टेंबरला पेन्शन अदालत

मुंबई : राज्य शासनाच्या  वित्त विभागामार्फत  निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे निवारण  करण्यासाठी  येत्या १८ सप्टेंबर रोजी  पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

प्रभादेवी येथील पु. ल. देशापांडे महाराष्ट्र्र कला अकादमी येथे सकाळी १० ते  दुपारी १ व  दुपारी २ ते ५ अशा दोन सत्रात ही पेन्शन अदालत होणार आहे. केंद्र शासनाच्या निवृत्त वेतन व निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाचे  १८ जुलै २०१८ रोजीच्या  आदेशानुसार राज्यातील सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी  व कर्मचारी  यांच्या सेवानिवृत्ती वेतनातील  त्रुटी  निवारणा संदर्भात या  पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी  व कर्मचाऱ्यांना वेतना संदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या संबंधित कार्यालयास १४ सप्टेंबर पूर्वी लेखी स्वरुपात ई-मेल, फॅक्स अथवा  पोस्टाद्वारे सादर कराव्यात. तसेच तक्रारीसह  पेन्शन अदालतीमध्ये स्वत: उपस्थित रहावे अथवा  प्रतिनिधी पाठवावे, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी ( प्र ) रश्मी नांदिवडेकर यांनी केले आहे.

Previous articleजितेंद्र आव्हाड श्याम मानव आणि मुक्ता दाभोळकरांना “वाय प्लस” सुरक्षा द्या
Next articleशाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची लोकप्रियता ढळली