जितेंद्र आव्हाड श्याम मानव आणि मुक्ता दाभोळकरांना “वाय प्लस” सुरक्षा द्या

जितेंद्र आव्हाड श्याम मानव आणि मुक्ता दाभोळकरांना “वाय प्लस” सुरक्षा द्या

मुंबई : ‘सनातन’च्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह श्याम मानव व मुक्ता दाभोळकर यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ हे उपस्थित होते.या भेटीमध्ये राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अंनिसचे पदाधिकारी श्याम मानव व मुक्ता दाभोळकर यांनाही ‘वाय प्लस’या दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर विचार करुन निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Previous articleसरकारमधील मंत्र्यांची दालने भ्रष्टाचाराचे अड्डे : धनंजय मुंडे
Next articleतक्रार निवारणासाठी १८ सप्टेंबरला पेन्शन अदालत