राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा ” शाॅक”

राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा ” शाॅक”

मुंबई : गगनाला भिडलेल्या इंधन दरवाढीनंतर आता राज्य वीज नियामक आयोगाने राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा “शाॅक” दिला आहे.मात्र २०१८-१९ या वर्षासाठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करून दक्षिण मुंबईतील जनतेला दिलासा दिला आहे.ही दरवाढ १ सप्टेंबर २०१८ पासून नवीन दर लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २०१८ -२०२० या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे दर १ सप्टेंबर पासून लागू झाले असल्याची माहिती वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कृषी क्षेत्राचे वीजदर ३ रुपये ३५ पैशांवरून ३ रुपये ५५ पैसे प्रती युनिट करण्यात आले आहे. तर घरगुती वीज ग्राहकांचे ० ते १०० युनिटसाठी ५ रु. ०७ पैशावरून ५ रु. ३१ पैसे तर १०१ ते ३०० युनिटसाठी ८.७४ रु. वरून ८.९५ रुपये प्रती युनिट असा नवीन दर जाहीर करण्यात आला आहे.

एकीकडे राज्यातील जनतेला वीजदर वाढ केली असतानाचा २०१८-१९ साठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करण्यात येवून दक्षिण मुंबईतील जनतेला दिलासा दिला आहे. तर उत्तर मुंबईतील अदानी इलेक्ट्रिसीटी व टाटा पॉवरच्या वीजेच्या दरात ० ते १ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

 

Previous articleइंधनावरील दुष्काळ कराचा लेजाजोखा सार्वजनिक करा : खा. सुप्रिया सुळे
Next articleबळीराजाला सुखी करावे, दुष्काळी भागात पाऊस पडावा