राष्ट्रवादीचे आ.जयदत्त क्षीरसागरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी गणपती दर्शनाच्या निमित्ताने वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने आ.क्षीरसिगर आणि मुख्यमंत्र्यांमधिल जवळीक अधिक वाढली असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडच्या दौ-यात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.त्यावेळी जयदत्त क्षीरसागर हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा होती.या भेटीनंतर मुख्यमंत्री आणि आ.क्षीरसागर यांच्यातील जववळीक वाढलेली आहे.आमदार जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’या निवासस्थानी जाऊन घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.त्यामुळे जयदत्त क्षीरसागर हे आगामी काळात भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.