“प्रसिद्धी विनायकाच्या” माध्यमातून राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील लघुपट राज्यातील शाळेत दाखविण्याच्या सक्ती प्रकरणावर आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फटका-यामधून गणपतीच्या जागी नरेंद्र मोदी आणि उंदराच्या जागी अमित शहा यांना दाखवले आहे.त्यापुढे स्वत:च्याच प्रसिध्दीच्या प्रेमात पडलेला प्रसिध्दी विनायक असा मथळाही त्यांनी लिहिला आहे. राज ठाकरे यांनी आजच्या व्यंगचित्रात गणेशमूर्तीला नरेंद्र मोदींचे रूप देवून चार हातात चार वेगवेगळी शस्त्रे दाखविली आहेत . एका हातात वर्तमानपत्रे, दुसऱ्या हातात, तिसऱ्या हातात पक्षनिधीसाठी पावती पुस्तक आणि चौथ्या हातात ईव्हीएम मशिन दाखविले आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी माध्यमे, मतदान यंत्रे आणि अर्थव्यवस्था पंतप्रधान मोदींच्या हातात असल्याचे रेखाटून या चारही बाबींचा दुरुपयोग होत असल्याचे दर्शविले आहे.या व्यंगचित्रात मोदींची आरती करताना, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांसह भाजपच्या नेत्यांना दाखविले आहे.