काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण
मुंबई : भानुशाली समाजाच्या गणेशोत्सव मंडळाला भेट दिल्यानंतर काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण करतानाचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाल्याने आ.नसीम खान यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
भानुशाली समाजाच्या गणेशोत्सव मंडळाच्या भेटीसाठी गेलो असता, त्या ठिकाणी दोन व्यक्तींनी माझ्यावर पैशांची उधळण केली.त्यावेळी मी संबंधितांना रोखण्याचाही प्रयत्न केला. पण भानुशाली समाजाच्या परंपरेत अडथळा आणणे मला योग्य वाटले नाही. मी तसे केले असते तर नवा वाद निर्माण झाला असता. या ठिकाणी पैसे मी उडवले नसल्याने माझ्या हातून कोणतेही चुकीचे काम झालेले नाही’, असे आ. नसीम खान यांनी स्पष्ट केले.