पंकजाताई….”माझ्या वाघाचं लेकरू ग !

पंकजाताई….”माझ्या वाघाचं लेकरू ग !

मुंबई : राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे ह्या आपल्या धडाकेबाज कामामुळे उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.आज एका कार्यक्रमात एका आज्जींनी त्यांना त्यांच्या कामाची पोच पावती दिल्याने ग्रामविकासमंत्र्यांनाही आनंद झाला.

आज आंबेजोगाई येथे महिला उद्योजकांच्या कार्यक्रमाला राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. पंकजा मुंडे या विविध उपक्रमाची माहिती घेत असतानाच त्यांची भेट एका आज्जीशी झाली. त्यांनी आयुष्यभर चुलीवर खवा उत्पादनाचे काम केले. चुलीच्या धुरापासून त्यांचे डोळे खराब झाल्यामुळे त्यांचे ऑपरेशन करावे लागले. परंतु आज त्यांना गॅसवरील प्रक्रिया मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

या आनंदातच त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा गालगुच्चा घेत त्या आज्जी म्हणाल्या “माझ्या वाघाचं लेकरू ग! किती करतंय आमच्यासाठी” …हे ऐकून मंत्री पंकजा मुंडे यांनाही भरून आले.

Previous articleतब्बल १५ लाख विद्यार्थ्यांनी पाहिला ‘चलो जिते है’
Next articleगमजा मारणारे सरकार आर्थिक व्यवस्थापनाबाबत तोंडावर पडले