४ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या
मुंबई : राज्य सरकारने आज ४ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून,के.बी.फंड यांची महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक केली आहे.
काही दिवसापूर्वीच ११ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्यानंतर आज राज्य सरकारने ४ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डाॅ. अनबालगन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई येथे नियुक्ती केली आहे. भाग्यश्री बानायत यांची संचालक रेशीम नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.तर; उप विभागीय निबंधक ( सहकारी सोसायटी ) डी.आर.तावरे यांची संचालक पणन पुणे येथे नेमणूक करण्यात आली आहे.