अरुण अडसड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड
मुंबई: कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे.भाजपचे माजी आमदार अरुण अडसड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.मात्र याची अधिकृत घोषणा दोन दिवसांनी केली जाईल.
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोंबरला पोटनिवडणूकीची घोषणा करण्यात आली होती. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे माजी आमदार अरुण अडसड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या रिक्त जागेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर त्याच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
आज अरुण अडसड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आदी भाजप नेते उपस्थित होते. अरूण अडसड हे दोन वेळा विधानसभेचे आमदार होते. तसेच केंद्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष होते.