राफेल प्रकरणी शरद पवारांनी नरेंद्र मोदींना क्लीनचीट दिलेली नाही
मुंबई : राफेल विमान खरेदी व्यवहारात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुठेही क्लीनचीट दिलेली नसून, प्रसिद्धी माध्यमांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितले.
विमानांच्या किंमती का वाढल्या असा प्रश्न उपस्थित करीत ते सरकारने स्पष्ट करायला पाहिजे .राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पवार यांनी मुलाखतीत केली होती. मोदींना पवारांनी क्लीनचीट दिली म्हणणा-यांनी पवारांची मुलाखत नीट बघितलेली नाही किंवा ते याबाबत संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोप खा.सुळे केला आहे.तारिक अन्वर यांनी पक्ष सोडल्याचे पक्ष वाईट वाटले. गेली २० वर्षे ते राष्ट्रवादीसोबत होते. त्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी पवारांशी एकदा चर्चा करायला हवी होती असेही खा. सुळे म्हणाल्या.