मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा होणार रिपब्लिकन पक्षाचा वर्धापनदिन
मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ६१ वा वर्धापन दिन सोहळा येत्या ३ ऑक्टोबरला ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्यने उपस्थित राहून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकारांच्या संकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष उभरण्याचा संकल्प करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष ३ ऑक्टोबर १९५७ रोजी स्थापन करण्यात आला. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाविरुद्ध देशातील प्रबळ व्यापक विरोधी पक्ष म्हणून सर्व समावेशक रिपब्लिकन पक्ष उभारण्याची महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. त्यानुसार सर्व जाती धर्मीयांचा पक्ष म्हणून सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष साकारण्याचा आमचा प्रयत्न असून त्यामुळेच दरवर्षी आपण रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिवस साजरा करतो. यंदाचा रिपाइंचा ६१ वा वर्धापन दिन असून, हा सोहळा ठाण्यातील हायलँड मैदानात ३ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे ;राज्यमंत्री रवींद्र चव्हाण ; महापौर मीनाक्षी शिंदे; खासदार कपिल पाटील ;खा.राजन विचारे; आमदार संजय केळकर; आ . निरंजन डावखरे; आ. प्रताप सरनाईक ; आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रामभाऊ तायडे असतील अशी माहिती रिपाइं तर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे .