…..आणि शरद पवारांनी हजारो कार्यकर्त्यांना घेतले सावलीत !

…..आणि शरद पवारांनी हजारो कार्यकर्त्यांना घेतले सावलीत !

बीड : मोठी माणसे मोठी का असतात हे लहान लहान गोष्टीमधुन प्रकर्षाने लक्षात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद
पवार यांचे ही मोठेपणे कसे आहे आणि कार्यकर्त्यांची त्यांना किती काळजी आहे याचा प्रत्यय आज बीड मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आला.शरद पवारांनी फक्त एक हात केला आणि उन्हात उभ्या राहिलेल्या हजारो कार्यकर्त्यांना सावली मिळाली.

बीड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी बागलाने मैदान तुडंब भरून गेले होते. मैदाना इतकीच गर्दी मैदाना बाहेर होती. उन्हामध्ये हे कार्यकर्ते उभा राहुन सभा ऐकत होते. पवार यांना झेड सुरक्षा असल्यामुळे  डी झोन करण्यात आला होता. या झोन मध्ये पोलीसांशिवाय कोणीच नव्हते आणि बाहेर मात्र हजारो लोक उन्हात उभे होते.

पवार यांच्या नजरेत ही गोष्ट येताच त्यांनी बाजुला बसलेल्या धनंजय मुंडेंना उन्हात असलेल्या लोकांना डी झोनमध्ये बसु द्या अशी सुचना केली माझ्या सुरक्षेपेक्षा उन्हातील लोकांची मला जास्त काळजी वाटते असे ते म्हणाले.

मुंडेंनी पोलीसांना त्या प्रमाणे सुचना दिली आणि एका क्षणात उन्हातील हजारो कार्यकर्ते डी झोन मधल्या सावलीमध्ये येऊन बसले. साहेबांना त्यांना अगदी जवळुन पहावयास मिळत होते, याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच जाणवत होता.

Previous articleहाऊसिंग फेडरेशनच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय
Next articleराष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामती सारखा का केला नाही :पंकजा मुंडे