“बापु”जीने के लिए ये लोग तो हानीकारक हैं : मुंडे

“बापु”जीने के लिए ये लोग तो हानीकारक हैं : मुंडे

पेट्रोल, डिझेल वाढीवर ट्विटरच्या माध्यमातुन धनंजय मुंडेंचा मोदींवर निशाना

मुंंबई : ”बापु, जीने के लिऐ ये लोग तो हानीकारक है, इनको बोलो हम पे थोडी दया तो करो हम आम आदमी है” असे म्हणत व्यंगचित्र आणि ट्विटरच्या माध्यमातुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी क्या यही है अच्छे दिन असे म्हणत पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे.

मागील चार महिन्यांपासुन दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नियमित वाढ होत आहे. या रोज वाढणार्‍या दरामुळे सामान्य जनता, वाहन चालक त्रस्त झाले असुन, त्यामुळे महागाई ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे ही दररोज एक ट्विटकरून रोजचे वाढलेले भाव ग्राफिक्सच्या माध्यमातुन सांगत क्या यही है अच्छे दिन असा सवाल पंतप्रधान मोदींना विचारीत आहेत.

दररोजच्या प्रमाणे आजही त्यांनी एक ट्विट करून आजच्या पेट्रोलच्या वाढलेल्या १२ पैसे आणि डिझेलच्या १७ पैसे वाढीची माहिती दिली आहे. त्याच बरोबर आजच्या महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधत एक सामान्य माणुस बापुंच्या प्रतिमेसमोर हात जोडुन ”बापु जीने के लिए ये लोग तो हानिकारक हैं, इनको बोलो(मोदी, शाहा) हम पे थोडी दया तो करो हम आम आदमी हैं” अशा गाण्याच्या ओळी म्हणत असल्याचे ग्राफिक्स ट्विटसोबत जोडले आहे. याच चित्रात एका बाजुला हा सामान्य माणुस बापुंची प्रार्थना करीत असतांना दुसर्‍या बाजुला मोदी आणि शाहा हे आपआपसात कसला तरी हिशोब करतानाचे दाखवले आहे. धनंजय मुंडे यांच्या या ट्विटला नेटकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Previous articleअहिंसेच्या दिवशी भाजप सरकारचा हिंसक चेहरा समोर आला :नवाब मलिक
Next articleकेंद्र व राज्य सरकारने सत्य अहिंसा शांती या तत्वांना तिलांजली दिली : अजित पवार