….आणि राहुल गांधी सोनिया गांधींनी ताट धुतले !

….आणि राहुल गांधी सोनिया गांधींनी ताट धुतले !

वर्धा: महात्मा गांधी जयंती निमित्त वर्धा येथे उपस्थित असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या बड्याबड्या नेत्यांनी दुपारचे जेवण झाल्यानंतर स्वतःच ताटे धुवून महात्मा गांधी यांच्या स्वावलंबन शिकवणाचे पालन केले.

महात्मा यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यासह काॅग्रेसचे नेते वर्धा येथे आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात दुपारचे भोजन घेतल्यानंतर त्यांनी स्वत:चे ताट स्वत:च धुतले. यावेळी उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांनी देखील याचे अनुकरण करीत स्वत:चं ताटे धुतली.महात्मा गांधी यांनी स्वावलंबनाची शिकवण दिली होती. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला.

Previous articleकेंद्र व राज्य सरकारने सत्य अहिंसा शांती या तत्वांना तिलांजली दिली : अजित पवार
Next articleराष्ट्रवादीच्या एकाही स्थानिक नेत्याची माझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नाही