धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा

धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा

प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या अंमलबजावणीस न्यायालयाची स्थगिती

अंबजोगाई : संत जगमित्र सुतगिरणी प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंट बाबत अंबाजोगाई न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालास कोर्टाने सदर बाबीच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळालेला आहे.

अंबाजोगाई न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी ५ सप्टेंबर रोजी दिलेल्या एका निकालात संत जगमित्र सुतगिरणी संदर्भात सुतगिरणीच्या व संचालकांची अर्जात नमुद केलेली मालमत्ता विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही असे म्हटले होते.

या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी याच कोर्टात अर्ज करून या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली होती. सदर कारवाई करतांना काही विशिष्ट लोकांवरच कारवाई करण्यात आली, गृहमंत्रालयाकडुन या बाबत घ्यावयाची परवानगी कायद्याला अभिप्रेत संज्ञेप्रमाणे न केल्यामुळे तसेच या प्रकरणी कोणतीही नोटीस न मिळाल्याने प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या निर्णयास स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच हा आदेश एकतर्फी असल्याचे ही म्हटले होते.

अर्जदारांचे म्हणणे ऐकुन घेवुन तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक व सरकारी पक्षाची बाजु ऐकुन घेत न्यायालयाने प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या दिलेल्या निकाला संबंधी सदर अंमलबजावणीस स्थगिती देत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

Previous articleमोदी आणि भाजपकडून जातीयवादाचे विष पसरवून राजकीय फायद्यासाठी देश तोडण्याचे काम
Next articleव्हॅट कमी करण्याचा निर्णय लोकांच्या डोळयात धुळफेक करणारा : नवाब मलिक