राज्यात पुन्हा “कमळ” फुलणार !

देशात आणि राज्यात पुन्हा “कमळ” फुलणार !

मुंबई: सध्याच्या परिस्थितीमध्ये देशात लोकसभा निवडणूका झाल्यास देशात आणि राज्यात भाजपला कौल मिळेल अशी स्थिती आहे तर राज्यात २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत सुपडा साफ झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीला फायदा होण्याचा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे.त्यानुसार भाजपला २२, काँग्रेेसला ११ तर राष्ट्रवादीला ८ तर शिवसेनेला ७ जागांवर यश मिळेल असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

येणा-या लोकसभा निवडणूका या सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढवल्या तरीही भाजपाला राज्यात २२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेनेने सर्वच निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांचा हा निर्णय नुकसानीचा ठरू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शिवसेना स्वतंत्र लढल्यास त्यांना केवळ ७ जागा मिळू शकतात.२०१४ निवडणूकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत.स्वबळावर निवडणूका लढल्यास त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीला होत असल्याचे दिसत आहे.गेल्या नैवडणूकीत मोदी लाटेचा तडाखा या दोन्ही पक्षांना बसला होता. काँग्रेसला २ जागा तर राष्ट्रवादीला ४ जागा जिंकता आल्या. आजच्या सर्वेक्षणानुसार येणा-या निवडणूकीत काँग्रेेसला ११ तर राष्ट्रवादीला ८ जागांवर यश मिळेल.

Previous articleव्हॅट कमी करण्याचा निर्णय लोकांच्या डोळयात धुळफेक करणारा : नवाब मलिक
Next articleविद्यार्थ्यांना दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा : सचिन तेंडूलकर