….तर राम कदमांचा राजीनामा घेतला असता : सुप्रिया सुळे
मुंबई : भाजपचे आमदार महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कसलीच कारवाई करत नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर तातडीने आमदार राम कदमांचा राजीनामा घेतला असता. सत्ता गेली तरीही बेहत्तर पण महिलांचा सन्मान महत्त्वाचा आहे. असे सांगत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
कोपरगाव येथे पार पडलेल्या महिला मेळाव्यात खा.सुळे बोलत होत्या. आघाडीच्या काळात महिलांचा सन्मान राखला गेला. स्व. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निर्णयामुळे महिला पोलीस महाराष्ट्रात दिसत आहेत. मुलींना समान अधिकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला असल्याचे असेही सुळे खा. यांनी भाजप आ. राम कदम यांच्या वक्तव्याचा पुन्हा समाचार घेतला. मी मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर कदम यांचा राजीनामा घेतला असता असे त्या म्हणाल्या.










