अजित पवारांचे पुत्र पार्थ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी

अजित पवारांचे पुत्र पार्थ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी

मुंबई : अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. पार्थ यांच्या उमेदवारीला थेट विरोध न करता,पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर सर्वसामान्य  कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असा सवाल शरद पवार यांनी केल्याचे समजते.

अजित पवारांचे पुत्र पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेली दोन दिवसापासून सुरू होती. मात्र पार्थ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. पार्थ यांच्या उमेदवारीबद्दल खुद्द पवारच अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. पवार कुटूंबातील सगळ्यांनीच निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार असा सवाल पवार यांनी केल्याचे समजते.पवार यांनी स्वतः निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता पवारांनी पार्थ यांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Previous articleशरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाही
Next articleकिती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे?: खा. अशोक चव्हाण