पुढचा मुख्यमंत्री मीच असेल : देवेंद्र फडणवीस
लातूर: येणा-या विधानसभा निवडणुकीनंतरही राज्याचा मुख्यमंत्री मीच असेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते आज लातूर येथिल एका कार्यक्रमात बोलत होते.
लातूर येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरण आणि सेवासुविधांसाठी तीन टप्प्यात १०० कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा करीत पहिल्या टप्प्यातील निधी लगेच तर दुसऱ्या टप्प्यातील निधी पुढच्या वर्षात आणि तिसरा टप्प्यातील निधी माझ्याच कार्यकाळात मिळेल. कारण आगामी विधानसभा निवडणूकीनंतरही राज्याचा मुख्यमंत्री मीच असणार आहे, असा दावा आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे केला आहे.