चर्मकार कल्याण आयोगाच्या अध्यक्षपदी वाय. सी. पवार

चर्मकार कल्याण आयोगाच्या अध्यक्षपदी वाय. सी. पवार

मुंबई : राज्याच्या संत रोहिदास चर्मकार कल्याण आयोगाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि निवृत्त आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार यांची रविवारी नेमणूक करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. आयोगाचे सदस्य म्हणून भैयासाहेब भिगणे यांची नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून एकेकाळी मुंबई पोलीस दलात आपला दबदबा राखणारे वाय. सी. पवार सेवानिवृत्तीनंतर भाजपात दाखल झाले होते. गेल्या काही वर्षांपासून ते पक्षाच्या प्रदेश संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.महाराष्ट्र चर्मकार परिषदचे अध्यक्षपद म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या नेमणुकीमुळे पक्षाकडून निष्ठावंतांना डावलले जात असल्याबद्दलचा रोष कमी होईल, अशी आशा भाजपाच्या गोटात व्यक्त होत आहे.

Previous articleमहाआरोग्य शिबीरातून महाराष्ट्र शंभर टक्के सुदृढ होईल हे ‘ अटल ‘ सत्य: पंकजाताई मुंडे
Next articleसंजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा : मनसेची पोस्टरबाजी