येत्या शनिवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?

येत्या शनिवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेरच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला असून, येत्या शनिवारी म्हणजेच १३ ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे. शपथविधीचा हा कार्यक्रम विधानभवन परिसरात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होत आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या २५ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या पाच कॅबिनेट तर सात राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा अजूनही भरायची आहे. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीच्या तीन जागा भरायच्या आहेत. राज्यातील फडणवीस सरकारची मुदत आणखी एक वर्ष आहे. त्याआधी मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. अशावेळी मंत्रिमंडळाचा हा संभाव्य विस्तार व खांदेपालट अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. रविवारीच मुख्यमंत्री राजधानी दिल्लीत गेले होते. तेथे त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या मंगळवारी राज्य मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. फडणवीस यांच्या कारर्कीर्दीत आतापर्यंत तीन वेळा मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. दोन वर्षांनंतर ही बैठक होत आहेत. एरव्ही दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक होते. मात्र, यात राज्यमंत्र्यांचा समावेश नसतो. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यामुळे उद्याच्या या बैठकीला महत्त्व आले आहे.

Previous articleपंकजा मुंडे यांनी अस्मिता, प्रधानमंत्री आवास आणि अतिक्रमण नियमानुकूल योजनांचा घेतला आढावा
Next articleआजी माजी आमदारांना एस.टी च्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत