तनुश्री प्रकरणी नाना पाटेकर यांना महिला आयोगाने बजावली नोटीस

तनुश्री प्रकरणी नाना पाटेकर यांना महिला आयोगाने बजावली नोटीस

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे काल दाखल केलेल्या तक्रारीची आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणी अभिनेता नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावत १० दिवसात आपले म्हणणे आयोगाकडे प्रत्यक्षपणे मांडावे असे निर्देश दिले आहेत.तनुश्री दत्ता यांची लेखी तक्रार त्यांच्यावतीने वकिलामार्फत सादर करण्यात आल्याने या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी तनुश्री दत्ता यांनी आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

तनुश्री दत्ता यांच्या तक्रारीत उल्लेख असलेल्या अभिनेता नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावत १० दिवसात आपले म्हणणे आयोगाकडे प्रत्यक्षपणे मांडावे असे निर्देश दिले आहेत. तनुश्री दत्ता यांनी आयोगाकडे दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत मुंबई पोलिसांकडे सदर प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांकडुन याबाबत आतापर्यंत काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल आयोगाने मागविला आहे.

सिनेसृष्टीतील अशा घटना रोखण्याची जबाबदारी निर्माते, दिग्दर्शक तसेच संबंधित संघटनांची देखील आहे. महिलांबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यास तसेच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे. यादृष्टीनेच कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, २०१३ या कायद्यानुसार सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी कमिटी) स्थापन करावी असे निर्देश आयोगाने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहेत.

Previous articleसावधान: आता प्लास्टिक आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द होणार
Next articleमंत्रिमंडळ विस्तार : ग्रामीण भागातल्या आमदारांना मंत्रिपद देण्याची मागणी