भारनियमनाविरोधात राष्ट्रवादीचे कंदील आंदोलन

भारनियमनाविरोधात राष्ट्रवादीचे कंदील आंदोलन

मुंबई : भारनियमनामुळे राज्यातील जनता हैराण झाली असून याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ज्या-ज्याठिकाणी  भारनियमन करण्यात आले आहे त्याठिकाणी १२ ऑक्टोबर रोजी कंदील आंदोलन करण्यात येणार आहे.असून, युवक संघटनेच्यावतीने एमएसईबीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून निषेध नोंदविला जाणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली

राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत असतानाच आता वीजवितरण महामंडळाकडून भारनियमन केले जात असल्याने सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. राज्यातील जनतेच्या समस्यांसाठी सरकारविरोधात आक्रमकपणे लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता लोडशेडिंगच्याविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.राज्यात ज्या ज्याठिकाणी भारनियमन  सुरु आहे त्या त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या येत्या १२ ऑक्टोंबरला कंदील आंदोलन करणार आहेत. शिवाय राष्ट्रवादीची युवक संघटना एमएसईबी  च्या कार्यालयासमोर आंदोलन करून जाब विचारणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनाकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

Previous articleमंत्रिमंडळ विस्तार : ग्रामीण भागातल्या आमदारांना मंत्रिपद देण्याची मागणी  
Next articleमहाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा तीन राज्यांना दिल्यानेच वीजटंचाई