भाजपच्या ४५ आमदारांना तर ६ खासदारांना येत्या निवडणूकीत धक्का बसणार !

भाजपच्या ४५ आमदारांना तर ६ खासदारांना येत्या निवडणूकीत धक्का बसणार !

मुंबई: भाजपच्या ४५ आमदारांची तर ६ खासदारांची गेल्या चार वर्षातील कामगिरी निराशाजनक असल्याने त्यांना येत्या निवडणूकीत पुन्हा निवडून येणे कठीण असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले असल्याचे समजते.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जनमताची चाचपणी सुरु आहे. त्याकरीता ‘चाणक्य’ या संस्थेकडून सर्वेक्षण केल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या निवडणूक देशात नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे देशात आणि राज्यात अनेक पक्षांना मोठा धक्का बसला होता. परंतु आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपलाच धक्का बसेल,असे एका अहवालनुसार पुढे आले आहे. सत्ताधारी भाजपाच्या एकूण ४५ आमदारांची गेल्या चार वर्षातील कामगिरी निराशाजनक असून त्यांना आगामी निवडणूक कठीण जाईल असे अहवालात म्हटले असल्याचे समजते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारकडून जनमताची चाचपणी करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या तयारीसाठी भाजपने दादरच्या वसंतस्मृती येथे खासदार आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि खासदाराच बंद लिफाफ्यात दिला होता. हा बंद लिफाफा घरी गेल्यानंतरच उघडण्याचे आदेश दिले होते.या लिफाफ्यात हा अहवाल होता असेही समजते.

Previous articleभाजपचे राष्ट्रवादीला खुल्या चर्चेचे आव्हान
Next articleमंत्रालयातील कर्मचा-याने का केला आत्महत्येचा प्रयत्न ?