मंत्रालयातील कर्मचा-याने का केला आत्महत्येचा प्रयत्न ?

मंत्रालयातील कर्मचा-याने का केला आत्महत्येचा प्रयत्न ?

मुंबई : आज मंत्रालयात उद्योग, कामगार आणि ऊर्जा विभागातील एका शिपायाने सक्तीची सेवानिवृत्ती दिल्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.दिलीप सोनावणे या कर्मचा-याचे नाव असून,या विभागाच्या सचिवांशी वादावादी झाल्यानंतर त्यांनी हा प्रकार केला.त्यानंतर त्यांना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उद्योग, कामगार आणि ऊर्जा विभागातील दिलीप सोनावणे शिपायाच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली असता त्यांना या प्रकरणी सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली होती. या निर्णयामुळे त्यांनी या विभागाच्या प्रधान सचिवांशी हुज्जत घातली. सोनावणे यांच्यावर कार्यालयातील साहित्य, स्टेशनरी आदी वस्तू विकणे वारंवार गैरहजर राहणे असे आरोप होते.विभागीय चौकशीनंतर त्यांना सेवेतून न काढता सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कालच सोनवणे यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा आदेश काढण्यात आले परंतु हा आदेश सोनवणे यांनी स्वीकारला नाही. या निर्णयामुळे सोनवणे यांनी आपल्या पत्नी-मुलासह मंत्रालयात कामगार विभागाचे प्रधान सचिवांच्या दालनाबाहेर त्यांनी गोंधळ घातला.मला लवकरच बढती मिळणार होती. त्यामुळेच मला सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आल्याचा आरोप करत सोनवणे यांनी फिनाईल पिण्याचा प्रयत्न केला.परंतु दालनाबाहेर असलेल्या कर्मचा-यांनी सोनवणे यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

Previous articleभाजपच्या ४५ आमदारांना तर ६ खासदारांना येत्या निवडणूकीत धक्का बसणार !
Next articleम्हाडाच्या घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी कमी होणार: उदय सामंत