म्हाडाच्या घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी कमी होणार: उदय सामंत

म्हाडाच्या घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी कमी होणार: उदय सामंत

मुंबई : म्हाडाच्या घराच्या प्रतिक्षेत असणा-यांसाठी आनंदाची बातमी असून,आता म्हाडाची घरे स्वस्तात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आता म्हाडाच्या घरांच्या किमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. यावर्षीच्या म्हाडाच्या घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी  करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.तसेच नाशिक, औरंगाबाद आणि नागपूरातील म्हाडाच्या विकल्या न गेलेल्या घरांच्या किंमती सरासरी २० ते ४७ टक्क्यांनी कमी केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

म्हाडा प्राधिकरणाची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली.या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. महिनाभरापूर्वी म्हाडाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी करण्याची घोषणा मी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हाडाचे अध्यक्ष आ. सामंत यांनी सांगितले. मुंबई मंडळाच्या १ हजार १९४ घरांची लाँटरी लवकरच काढण्यात येणार असून, या घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी असतील अशी माहिती त्यांनी देवून,लाॅटरीची तारीख लवकरच घोषित करणार असल्याचे सांगितले.

विकासकांकडून मिळणा-या घरांच्या किंमतीही कमी करण्यात येणार आहेत. उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किंमती रेडीरेकनरच्या सत्तर टक्के दराने विकण्यात येतील असे त्यांनी सांगितले. उच्च उत्पन्न गटातील १ कोटी ४० लाख रुपयांचे घर आता ९९ लाख रुपयांना मिळणार आहे तर; मध्यम उत्पन्न गटातील घरे रेडीरेकरनच्या ६० टक्के, अल्प उत्पन्न गटातील घर रेडीरेकनरच्या ५० टक्के व अत्यल्प उत्पन्न गटातील घरे रेडीरेकनरच्य दराच्या ३० टक्क्याने मिळतील असे सांगून, विकासकांकडून मिळणा-या या घरांची स्वतंत्र लाँटरी काढण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleमंत्रालयातील कर्मचा-याने का केला आत्महत्येचा प्रयत्न ?
Next articleतावडे साहेब..राज्यातील जनतेची माफी मागा: मुंडे