पंकजा मुंडे यांच्या झुंजार नेतृत्वाची परराज्यातील जनतेलाही भुरळ

पंकजा मुंडे यांच्या झुंजार नेतृत्वाची परराज्यातील जनतेलाही भुरळ

मुंबई: राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाची भुरळ परराज्यातील जनतेलाही पडली आहे. सावरगांव घाट येथे त्यांच्या उपस्थितीत होणा-या दसरा मेळाव्यातील त्यांचे विचार ऐकण्यासाठी राजस्थान, गुजरात, तेलंगणा सह मध्यप्रदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत.

राजस्थान , गुजरात , तेलंगणा सह मध्य प्रदेशातील इंदोर येथे अखिल भारतीय वंजारी सेवा संघाची बैठक नुकतीच झाली. सावरगाव घाट येथे येत्या १८ तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मेळाव्याला  भाविक लाखोच्या संख्येने  उपस्थिती लावणार असल्याची माहिती मिळाली आहे. अखिल भारतीय वंजारी सेवासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज उगलमोगले यांच्या पुढाकाराने मध्यप्रदेशासह अन्य राज्यातील भाविकांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात पार पडत असलेल्या राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा व दसरा मेळाव्यासाठी सावरगाव घाट येथे जाण्याचे नियोजन केले आहे.

पारंपारिक वेशभुषेत हे भाविक सावरगाव घाट येथे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती  सुत्रांनी दिली असुन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत त्यांच्या निवासाची व्यवस्था औरंगाबाद व सावरगाव येथे केली जाणार आहे.मध्य प्रदेश बरोबरच तेलंगणा राज्यात सुद्धा  अखिल भारतीय वंजारा सेवा संघाचे अध्यक्ष राजू करिपे यांच्या अध्यक्षतेखाली दसरा मेळावा बैठक संपन्न झाली . गुजरात, राजस्थान, तेलंगणा सह मध्यप्रदेशातुनही सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला भाविकांची ऊपस्थिती लक्षवेधक ठरणारी असुन महाराष्ट्रात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे प्रसिद्ध झालेला दसरा मेळावा पंकजा मुंडे यांच्यामुळे देशभर नावारुपास येत  असल्याचे मनोज उगलमोगले यांनी सांगितले.

Previous articleधनंजय मुंडेंनी वाचवले दोन अपघातग्रस्तांचे प्राण
Next articleसरकारच्या आशिर्वादानेच कट्टरतावादी बेफाम