राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी राज्य सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. राज्य सरकारने कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाने यासंदर्भात आज शासन निर्णय जारी केला असून,१ ऑक्टोबर २०१८ पासून महागाई वाढ रोखीने देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज घेतला आहे.राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्याच्या दरात १ जानेवारी २०१८ पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन संरचनेतील वेतनावरील देय महागाई भत्याचा दर १३९ टक्के वरून १४२ टक्के करण्याचा म्हणजे ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हि वाढ १ ऑक्टोंबर २०१८ पासून रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आजच्या या निर्णयामुळे कर्मचा-यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. १ जानेवारी ते ३० सप्टेंबर, २०१८ या ९ महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश राज्य शासन निर्गमित करणार आहे.

Previous articleधारावी पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा
Next articleपावसाने जरी पाठ फिरवली, तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठिशी:पंकजा मुंडे