पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे विदर्भाच्या दौ-यावर

पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे विदर्भाच्या दौ-यावर

मुंबई : पक्ष बांधणी करण्यासाठी आणि पदाधिका-यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आठ दिवसाच्या विदर्भ दौ-यासाठी रवाना झाले.या दौ-यात ते अमरावती,यवतमाळ,वाशिम,अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

विदर्भाच्या आठ दिवसाच्या दौ-यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रवाना झाले आज रात्री ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून अमरावती एक्सप्रेसने ते अमरावतीला रवाना झाले या आठ दिवसाच्या दौ-यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती,यवतमाळ,वाशिम,अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना भेटी देवून पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेवून पक्ष बांधणी करणार आहेत.आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होणा-या या विदर्भ दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleपावसाने जरी पाठ फिरवली, तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठिशी:पंकजा मुंडे 
Next articleवाह रे मोदी तेरा खेल :राष्ट्रवादीचा राज्यभर एल्गार