आरे…लपून वार काय करता, समोरून वार करा

आरे…लपून वार काय करता, समोरून वार करा

पंकजा मुंडेंचे धनंजय मुंडेंना आव्हान

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन

सावरगाव : वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येईल’ असे सुनावत,लपून वार काय करता, समोरून वार करा  असे आव्हान राज्याच्या ग्रामविकासंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव घेता दिले.तोडपाणी करण्याची कामे आम्ही करत नाही,सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले.असा टोलाही त्यांनी सावरगाव येथे पार पडलेल्या दसरा मेळाव्यात लगावला.

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव येथे दसरा मेळावा पार पडला.या मेळाव्याला मोठ्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली होती.आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.या मेळाव्याच्या भाषणामध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी प्रामुख्याने धनंजय मुंडे यांनाच लक्ष्य करीत त्यांचे नाव न घेता टीका केली.

उद्याचा दिवस मावळायच्या आत ‘ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा केली जाईल असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.या मेळाव्यात भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पण ग्रामविकासमंत्री पंकजा यांच्या हस्ते झाले.आज खऱ्या अर्थाने भागवानबाबांनी भगवान गडावरून सावरगाव येथे सीमोल्लंघन केले आहे. भगवानबाबांची ऊसतोड कामगार ही संपत्ती आहे. दुष्काळाला घाबरू नका, मी आणि आपले सरकार तुमच्या पाठीशी आहे असा दिलासा देतानाच पुन्हा हेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा दसरा मेळाव्यात बोलताना केला.ज्यांनी मुंडे साहेबांना त्रास दिला त्यांनीच मुंडे साहेबांनंतर मला त्रास दिला.असे सांगत मुलगी जन्मली की येथे येऊन भक्तिचा धागा बांधायचा. मी कधीही थकणार, झुकणार नाही, घेतला वसा सोडणार नाही,असा विश्वास मुंडे यांनी यावेळी दिला.

Previous articleवाह रे मोदी तेरा खेल :राष्ट्रवादीचा राज्यभर एल्गार
Next article…..नाही तर आम्ही राम मंदिर बांधू : उद्धव ठाकरे