एक रूपयाही खर्च झाला नाही, मग भ्रष्टाचार कसा झाला ?

एक रूपयाही खर्च झाला नाही, मग भ्रष्टाचार कसा झाला ?

लोकमंगल मल्टी स्टेटचा खुलासा

सोलापूर :लोकमंगल मल्टी स्टेट को. ऑप. सोसायटीच्या वतीने आयुक्त, दुग्ध व्यवयाय यांना  सर्व चौकशी निपक्षपातीपणे पार पडावी याकरिता पत्र दिलेले असून, आतपर्यंत या प्रकल्पासाठी एक रूपयाचाही निधी लोकमंगल मल्टी स्टेट को. ऑप. सोसायटीने खर्च केलेला नाही. व जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत खर्चही करणार नाही असे स्पष्ट करीत सदरचे आरोप राजकीय द्वेषातून होत असल्याचे लोकमंगल मल्टी स्टेट को. ऑप. सोसायटीने संजय निरूपम यांच्या आरोपानंतर खुलाशात म्हटले आहे.

लोकमंगल मल्टी स्टेट को. ऑप. लि सोसायटीने आजपर्यंत शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबविले आहेत.दुध उत्पादक शेतक-यांच्या योईसाठी दुध भुकटीचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. या  प्रकरणी अनेक कायदेशीर परवानग्या आवश्यक होत्या त्यामुळे या परवानग्या मिळविणे व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी याचा अनुभव असणा-या कन्सलटंटला याचे काम देण्यात आले. याकरिता द्विपक्षीय करारनामा करण्यात आला व सर्व कागदपत्रे तयार गोळा करण्याची जबाबदारी यांच्यावर सोपविण्यात आली.या प्रकरणी काही तक्रारी असल्याची बाब काही वर्तमानपत्रातून कळाली. त्यामुळे लोकमंगल मल्टी स्टेट को. ऑप. सोसायटीच्या वतीने आयुक्त, दुग्ध व्यवयाय यांना  सर्व चौकशी निपक्षपातीपणे पार पडावी याकरिता पत्र दिलेले आहे. आतपर्यंत या प्रकल्पासाठी एक रूपयाचाही निधी लोकमंगल मल्टी स्टेट को. ऑप. सोसायटीने खर्च केलेला नाही. व जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत खर्चही करणार नाही असे स्पष्ट करीत सदरचे आरोप राजकीय द्वेषातून होत असल्याचे लोकमंगल मल्टी स्टेट को. ऑप. सोसायटीने आपल्या खुलाशात म्हटले आहे.

Previous articleसुभाष देशमुखांच्या संस्थेने कोट्यावधी लाटल्याचा संजय निरुपमांचा आरोप
Next articleएसटी कर्मचाऱ्यांना २५०० तर अधिकाऱ्यांना ५००० रुपयांची दिवाळी भेट