पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून,राज्याचे दुग्धविकास आयुक्त आर. आर. जाधव यांची कामगार आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
विद्यमान कामगार आयुक्त एन. के. पोयम यांची दुग्धविकास आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव ए. आर. काळे यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नाशिकचे अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त डी. बी. गवादे यांची महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव एम. जे. प्रदीप चंद्रन यांची अमरावतीत अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.











