आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय 

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय 

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामास गती देण्यासह मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय पुढील प्रमाणे

१. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामास गती देण्यासह मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन्यास मान्यता.

२. पुणे वनवृत्तात वन्यप्राण्यांसाठी उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर) स्थापन्यास मान्यता.

३. मराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायासाठी मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देण्याच्या पथदर्शी योजनेस मान्यता.

४. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या शासकीय जमिनीवरील अपात्र अतिक्रमणधारकांना एकरकमी मोबदला देण्यास मान्यता.

५. मुंबई शहराच्या डायल-१०० प्रकल्पासह शहर सीसीटीव्ही प्रकल्प व्यापक करणार.

 

 

Previous articleलवकरच १७९ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करणार
Next articleराज्यातील १८० तालुके  दुष्काळ सदृश्य घोषित