राज्यातील १८० तालुके दुष्काळ सदृश्य घोषित
मुंबई : यंदा राज्यात ७७ टक्के पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्याने केंद्र सरकारच्या निकषानुसार राज्यातील १८० तालुके राज्य सरकारने दुष्काळ सदृश्य घोषित केले आहेत.त्यानुसार विविध उपाययोजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्य सरकारकडून आज १८० तालुक्यात टंचाई सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे.त्यानुसार संबंधित तालुक्यात तात्काळ उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.त्यानुसार जमीन महसूल सूट ,कृषी कर्ज वसुली स्थगिती ,वीज खंडित न करणे ,विध्यार्थ्यना शालेय खर्चात सूट ,रोहीयो अंतर्गत कामाच्या निकषात सूट ,शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज खंडित न करणे.या उपाय योजना सुरू केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. १८० तालुके दुष्काळ सदृश्य घोषित केले असले तरी सध्या चारा छावण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.केंद्राचे पथक साक्षांकन करेल व त्यानंतर केंद्र सरकार दुष्काळाची मदत जाहीर करेल. दुष्काळावर विरोधकांनी राजकारण करू नये. ऑक्टोबर मध्ये दुष्काळ जाहीर करणारे हे पहिले सरकार आहे, असा टोला त्यांनी लगावला.











