आम्हाला वाचवा….आम्ही बुडायला लागलो…. लवकर बोट पाठवा !
मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या शुभारंभाला निघालेल्या स्पीड बोटींपैकी एक बोट लाईट हाऊसजवळ एका खडकावर आदळून अपघात झाला.या बोटीत २५ जण होते. या बोटीत बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे खाजगी सचिव श्रीनिवास जाधव यांच्यासह अनेक महत्वाचे व्यक्ती होते.बोट खडकावर आदळली आणि बोटीत पाणी शिरायला लागले. बोटीतील प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या जवळच्या व्यक्तींना फोन करुन जीव वाचवण्याची विनवणी करत होते. त्या वेळी श्रीनिवास जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना त्वरीत संपर्क केल्याने पुढील अनर्थ टळला.
या बोटीतील शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता सिद्धेश पवार बेपत्ता असल्याची माहिती आहे.तर या अपघातात जखमी झालेला दुसरा युवक गंभीर असुन सेंट जाॅर्ज रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे.दुसरीकडे मच्छिमार संघटनेने शिवस्मारकासाठी निवडण्यात आलेली जागा अयोग्य असल्याचे म्हटले आहे. या जागेसाठी विनायक मेटे का आग्रही आहेत, असा सवाल संघटनेचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी उपस्थित केला
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांचे खाजगी सचिव श्रीनिवास जाधव यांनी सांगितल्या नुसार ही बोट खडकावर आदळली आणि बोटीत पाणी शिरायला लागले. बोटीतील प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या जवळच्या व्यक्तींना फोन करुन वाचवण्याची विनवणी करत होती. त्या वेळी जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना त्वरीत संपर्क केल्याने पुढील अनर्थ टळला, आम्ही बुडायला लागलो, आम्हाला वाचवा. लवकर बोट पाठवा असे जाधव यांनी सांगितल्यावर ५ मिनीटातच जयंत पाटील यांची बोट अपघात स्थळी पोहचली.
अरबी समुद्रात होत असलेल्या या बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीला पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर आज बुधवारी २४ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार होती. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे कंत्राट एल अँड टी कंपनीला देण्यात आलेले आहे. बुधवार पासुन या स्मारकासाठी समुद्रात नियोजित स्थळी भराव टाकला जाणार होता.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत बोलताना हा मोठा अपघात केवळ पोलीस आणि तटरक्षक दल यांच्या मुळेच टळल्याचे सांगीतले, त्वरीत घटनास्थळी मदत पोहचल्याने पुढचा अनर्थ टळला मात्र या पुर्ण अपघाताची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पायाभरणी कार्यक्रमाला मुख्य सचिव, अन्य शासकीय अधिकारी, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे तसेच पत्रकार व छायाचित्रकार दुपारी ३ वाजताच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया येथून निघाले. दरम्यान, बोटींचा ताफा स्मारकाच्या नियोजित स्थळाकडे जात असतानाच यातील एक स्पीडबोट खडकावर आदळून ही भीषण दुर्घटना घडली.या वेळी पत्रकार नेहा पुरव होत्या, त्यांनी सांगितले की काही वेळ आमच्या बोटीवर घबराट पसरली होती, बाहेर च्या जगाचा संपर्क सुरुवातीला होत नव्हता, ही बोट देखील भरकटलेली असल्याने निश्चित आपण कुठे चाललोय काही कळत नव्हते, त्यात ही स्पीडबोट बुडाल्याची माहीती वाहीन्यांवर सुरु होताच वातावरण अधिकच गंभीर झाले.सुरुवातीला मुख्य सचिव डि.के. जैन यांच्या बोटीला अपघात झाल्याच्या बातम्या येत होत्या, नंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले मात्र हा शिवस्मारकाच्या बांधकामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगण्यात आले.










