हा प्रकार केवळ अपघातच आहे की घातपात :अशोक चव्हाण
मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणा-या बोटीला झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे.हा प्रकार केवळ अपघातच आहे की घातपात असा संशय जाणवू लागला आहे कारण कालच आ. विनायक मेटे यांनी शिवस्मारकात अनियमितता असल्याचा आरोप करणे त्याच्या चौकशीची मागणी करणे आणि आज हा अपघात होणे हे संशयास्पद आहे.यामागे विनायक मेटेंना शांत करण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे.










