विमानात शरद पवार – ठाकरे यांची ‘राज’की बात
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जवळीत वाढताना दिसत आहे. राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे.आज औरंगाबाद ते मुंबई विमान प्रवासात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेजारी शेजारी बसून अनेक राजकीय घडामोडीवर चर्चा केल्याचे समजते.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद ते मुंबई हा प्रवास एकाच विमानातून केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला आहे. हे दोन्ही नेत्यांनी शेजारी शेजारी बसून या प्रवासादरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे सांगण्यात येते.गेली आठ दिवस विदर्भाच्या दौ-यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईला जाण्यासाठी औरंगाबाद येथे आले होते. संध्याकाळीच्या विमानाने राज ठाकरे हे विमानाने मुंबईकडे रवाना झाले. याच विमानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा प्रवास करत होते. या प्रवासात पवार आणि ठाकरे हे शेजारी शेजारी बसले होते.त्यावेळी या दोन नेत्यांमध्ये कोणती ‘राज’की बात झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.