मोदी म्हणजे डेंग्यूचा डास! आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

मोदी म्हणजे डेंग्यूचा डास! आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी खालच्या पातळीवरुन टीका केली आहे. देशात मोदीबाबा नावाचा डेंग्युचा मोठा डास आला आहे, असे वक्तव्य त्यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात केले. या डासाला फवारणी करुन हाकलून लावायचे आहे. त्याच्यामुळे सर्वांना आजार होत आहे, असे शिंदे म्हणाल्या. दरम्यान, या वक्तव्यावरुन मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

आ.शिंदे यांनी मोदींवर अनेक आरोप केले. मोदींना खोटे बोलण्याची सवय लागली आहे. १५ लाख लोकांच्या खात्यात जमा केलेच नाहीत. नोटबंदीमुळे सामान्यांना फटका बसला. मोदींना बहिण, बायको, किंवा मुलगी नाही. त्यामुळे त्यांना महिलांना काय त्रास होतो ते कळणार नाही. आईला फोटोसाठी नोटबंदीच्या वेळेस रांगेत उभे केले. मोदी जग फिरतात पण शेतकऱ्यांची स्थिती पहायला येत नाहीत, असा हल्ला त्यांनी चढवला.

प्रणिती शिंदे एवढ्यावर थांबल्या नाहीत तर सोलापूरचे भाजपचे खासदार बेवडे असल्याचेही शब्द वापरले. कॉंग्रेसच्या काळातील कामांचं उद्घाटने बेवडा खासदार करत आहेत, असे त्या म्हणाल्या.आता शिंदे यांच्या भाजपचे या टीकेला भाजप नेते कसे उत्तर देतात, याची उत्सुकता आहे.

Previous articleशिवस्मारक सरकार बांधत आहे, भाजप नाही : उद्धव ठाकरे
Next articleव्हायरस’ लागलेले सरकार ‘फॉरमॅट’ मारून‘डिलीट’ करा!: विखे पाटील