अजित पवारांची खोपडी रिकामी : सामनातून हल्लाबोल
मुंबई : अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.अजित पवारांची खोपडी रिकामी असल्याची टीका करण्यात आली आहे.
अजित पवार आपल्या काकांच्या पुण्याईवर तरले असून भाजपची चमचेगिरी केल्यानेच बाहेर राहिले आहेत, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. याबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष शरद पवारांच्या करंगळीवरचा एकखांबी तंबू आहे आणि अजित पवारांची रिकामी खोपडी हा कळस आहे, अशी अत्यंत आक्रमक भाषेत सेनेने पवार काका पुतण्यांचा समाचार घेतला आहे. अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात काडीचीही किंमत नाही, असेही अग्रलेखात म्हटले आहे. शरद पवार यांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहून सेनेने अजित पवारांबाबत इतकी आक्रमक भाषा वापरल्याचे बोलले जाते. आता राष्ट्रवादीकडूनही जशास तसे उत्तर शिवसेनेला दिले जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.