भुजबळांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटुन उठेल-धनंजय मुंडे

भुजबळांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटुन उठेल-धनंजय मुंडे

मुंबई :मुख्यमंत्री महोदय राज्यात हे काय चालले आहे. मनोहर भिडेच्या पिलावळीला आवरा, छगन भुजबळांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटुन उठेल असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात मनुस्मृतीचे समर्थन करतांना मनोहर भिडे आणि मनुस्मृती विरूध्द बोलाल तर तुमचाही दाभोळकर, पानसरे करू अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे.

सदर धमकीच्या अनुषंगाने मुंडे यांनी एक ट्विट करून तिव्र संताप व्यक्त केला असुन मुख्यमंत्री  पुरोगामी महाराष्ट्रात हे काय चालले आहे असा प्रश्न विचारला आहे. मनोहर भिडे आणि त्यांची पिलावळ पुरोगामी विचारांच्या प्रत्येकाचा पानसरे, दाभोळकर करायला निघाली आहे. या पिलावळीला वेळीच आवर घाला. छगन भुजबळ  आणि पुरोगामी विचारांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटुन उठेल असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.

Previous articleपंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली ग्रामीण बचतगटांच्या महिलांची अमेरिका भरारी
Next articleदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकायच्या दृष्टीने कामाला लागा : आठवले