सरकारला घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे :अजित पवार

सरकारला घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे :अजित पवार

पुणे: युती सरकारने अच्छे दिन आणण्याच्या नावाखाली जनतेची फक्त दिशाभूल केली. या फसव्या सरकारला घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी आज केले.

विकासकामांच्या उद्घाटनासाठी लोणी काळभोर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी युती सरकारवर हल्ला चढवला. अजित पवार म्हणाले की, खोटे बोल पण रेटून बोल असा या सरकारचा चार वर्षातील कारभार राहिला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, महागाई, बेरोजगारी यामुळे जनता त्रस्त आहे. व्यापाऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. मराठा, धनगर यांना आरक्षणाचे गाजर दाखवून झुलवत ठेवले, असा आरोपांचा पाढाच त्यांनी वाचला. शेतकऱ्यांना भाजप शिवसेना सरकारने वारंवार अडचणीत आणले, अशी टीकाही त्यांनी केली.

मात्र अजित पवार यांनी आजच्या भाषणात शिवसेनेवर एकही आरोप केला नाही. राम मंदिराच्या मुद्यावर पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांना डिवचल्यावर दोन्ही पक्षात जोरदार वाक्युद्घ भडकले होते. पण पवार यांनी टीकेचा सर्व रोख भाजपकडेच ठेवला होता.

Previous articleबेघरांना मिळणार परवडणाऱ्या किंमतीत घरे : पंकजा मुंडे
Next articleराज्यातील १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर