परळीत मोदी सरकारच्या विरोधात “बॅलन्स चेक करो” आंदोलन
परळी : मोदी सरकारच्या आपल्या खात्यावर पंधरा लाखाच्या आश्वासनाची राष्ट्रवादी काँग्रेसने उलट तपासणी केली आहे. परळीत “बॅलन्स चेक करो” आंदोलन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने देशातील जनतेला आशेला ला लावून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या फसव्या आंदोलनाची खिल्ली उडवत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खात्यावर पंधरा लाखाच्या आश्वासनाची धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने उलट तपासणी केली आहे.बँकेत जाऊन प्रतीकात्मक पासबुक एन्ट्री करून “बॅलन्स चेक करो” असे अभिनव आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
केंद्रातील एनडीए सरकारला साडेचार वर्षे तर राज्यातील सरकारला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. परंतु या कालावधीत जनतेच्या नशिबी घोर निराशेशिवाय दुसरे काही आले नाही.अनेक फेकू व चमकु आश्वासनांनी जनतेला भूलथापांशिवाय पदरी काही पडले नाही. या जनविरोधी सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. हा रोष विविध मार्गाने बाहेर पडत आहे. या अनुषंगाने पंतप्रधानांनी प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचा भांडाफोड करण्यासाठी परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने “बॅलन्स चेक करो” असे अभिनव आंदोलन करण्यात आले. नागरिकांनी आपापली पासबुके घेऊन आले आणी पदरी निराशा पाहुन राष्ट्रवादी चा हलवा खाऊन परतले.यावेळी सामान्य नागरीक राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.