दुष्काळावर सरकारने फक्त शब्दांचा खेळ केला :उद्घव ठाकरे
मुंबई: दुष्काळ गंभीर आहे, पण सरकारने मात्र त्याबाबत फक्त शब्दांचा खेळ केला, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी सरकारला फटकारले आहे. आगामी निवडणुकीबाबत धोरण ठरवण्यासाठी शिवसेना आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक त्यांनी बोलवली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते।
यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे शिवसैनिकांना आवाहन केले.
राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेनेच ऐरणीवर आणल्याचा दावा त्यांनी केला। ठाकरे म्हणाले की. शिवसेनेने मंदिराचा मुद्दा आणल्याने आता सगळी धावपळ सुरु झाली आहे. तुम्ही जर मंदिर करु शकत नसाल तर सत्तेवर राहू नका, इतकंच माझं म्हणणं आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेनेने निवडणुका जवळ येत आहेत तशी भाजपवरील टीकेची धार तीव्र केली आहे. आज मात्र त्यांनी भाजप़वर नेहमीसारखी आक्रमक आणि धारदार टीका केली नाही. संयत शब्दांत त्यांनी सरकारला फटकारले आहे. यामुळे सेनेच्या धोरणात बदल होणार आहे का, या विचाराने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.