सचिन तेंडुलकर राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा ‘दीपोत्सव’

सचिन तेंडुलकर राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा ‘दीपोत्सव’

मुंबई : मुंबईसह राज्यभरात दिवाळीच्या सण उत्साहात साजरा केला जात असताना आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे मनसेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

दिवाळीनिमीत्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भारतरत्न सचिन तेंडुलकरने सपत्नीक हजेरी लावली होती. यावेळी शिवाजी पार्क परिसरात रोषणाईही करण्यात आली होती. दीपोत्सवाचे उद्घाटन सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा परिवार उपस्थित होता.

Previous articleअमेरिका दौऱ्यातून महिलांना झाली जागतिक बाजारपेठेची ओळख
Next articleरात्रीच्या अंधारात उंदरांनाही बळ येते : उद्धव ठाकरे