वाघिणीला मारण्याच्या प्रकरणाची चौकशी कोणत्याही संस्थेमार्फत करावी : मुनगंटीवार
मुंबई : आठ आदिवासींसह १३ जणांचा बळी घेतलेल्या वाघीणीाला मारण्याच्या सूचना उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी टी-एक वाघिणीला मारण्याच्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कोणत्याही संस्थेमार्फत करावी असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार सांगितले.
केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी ट्विट करून वाघीणीच्या मृत्यूबद्दल भाष्य केल्याने अस्वस्थ झालेल्या मुनगंटीवार यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत अनेक वेळा टी-एक वाघिणीच्या नरभक्षक असण्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. कोणाही वन्यप्राण्याला वाघैणीला मारण्याचे अधिकार वनमंत्री किंवा सचिवांना नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तेे अधिकार पीसीसीएफला असतात. त्यांनी आधी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे प्रयत्न केले. मात्र वाघणीने त्यांच्या जिप्सी गाडीवर हल्ला केला. तेव्हा गोळी घालण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे वनकर्मचारी वन्यप्राण्याचे शत्रू नाहीत. या राज्यात देशातील सर्वात मोठे व्याघ्र क्षेत्र आहे. तसेच सर्वात जास्त वाघही याच राज्यात आपल्या वनमंत्रीपदाच्या कार्यकालात वाढले असा दावा वनमंत्री मुनगंटीवार यांनी केला. वनात राहाणारे आदिवासी व इतर जमाती या वनाचे संवंर्धन व रक्षण करतात. त्यांचेच बळी जात असतील तर त्यांचे वनप्रेम कसे राहील असा सवाल त्यांनी केला.मनेका गांधी या आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत मात्र त्यांना योग्य माहिती मिळाली नसावी त्यामुळे ते ट्विट केले असावे. मात्र त्यामुळे निष्ठेने काम करणा-या वनकर्मचा-यांचे खच्चीकरण होऊ शकते असेही ते म्हणाले. आपण केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना पत्र लिहीणार आहोत असेही मुनगंटीवार म्हणाले.