मुख्यमंत्री करणार दुष्काळी भागांचा दौरा
मुंबई:राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाला दुष्काळाने विळखा घातला आहे. दुष्काळी भागांचा आपण दौरा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
१५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यावर मुख्यमंत्री आता त्या भागांचा दौरा १५ नोव्हेंबरपासून करणार आहेत. त्या भागांत दुष्काळी उपाययोजना केल्या जात आहेत की नाही, ते आपण पाहणार आहोत, असे त्यांनी सांगितले. दुष्काळावर विरोधी पक्षांना केवळ राजकारण करायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.राज्यात २१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.विना आवाजाचे फटाके कधीही उडवता येतील, असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी फटाकेबंदीच्या न्यायालयाच्या निर्णयावर दिला. ते म्हणाले की, आवाजाचे फटाके उडवायला रात्री ८ ते १० ही वेळेची मर्यादा आहे. मात्र विना आवाजाचे फटाके कधीही उडवता येतील.