भाजपच्या फेकाफेकीवर “लक्ष्मीही” थक्क !

भाजपच्या फेकाफेकीवर “लक्ष्मीही” थक्क !

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसापासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून केंद्र सरकार,भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. गेल्या साडे चार वर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून फटकारे लगावले आहेत. आजच्या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दिघांचे फोटो दाखवण्यात आले असून, त्यांच्या फोटोंसमोर लक्ष्मी उभी आहे. या तिन्ही नेत्यांच्या फोटोंकडे पाहून लक्ष्मी म्हणतेय की,’बाबांनो गेल्या साडेचार वर्षात जनतेसमोर तुम्ही फेकलेल्या लाख, कोटीचे आकड्यांनी मी थक्क झाले आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

Previous articleवाघीण मृत्यू प्रकरणी सुधीर मुनगंटीवारांचा राजीनामा मागणे चुकीचे
Next articleया सरकारला सत्तेचा माज आलाय : राज ठाकरे