पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी दिल्या एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा
परळी:राज्याच्या ग्रामविकासमंत्री मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे अचानक समोरासमोर आले. परळीच्या पेठांमध्ये दोघेही एकमेकांना पाहताच थांबले. एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि दिवाळी शुभेच्छा दिल्या. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात विस्तवही जात नाही हे सर्वांना माहीतच आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर राज्याला माहीत आहे. दोघांनीही एकमेकांवर तिखट भाषेत टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर परळीच्या बाजारात दोघांचीही एका दुकानात अचानक गाठ पडली. सर्वच काही क्षण स्तब्ध झाले. कार्यकर्तेही थांबले. मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांना हस्तांदोलन करत हॅपी दिवाळी म्हटले. कार्यकर्त्यानीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. धनंजय यांनी पंकजा मुंडे यांचे पती पालवे यांच्याशीही हस्तांदोलन केले.