मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ पक्षाची स्थापना

मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ पक्षाची स्थापना

मुंबई : अखेर आपल्या विविध मागण्यासाठी मराठा समाजाने ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या नव्या पक्षाची आज पाडव्याच्या मुहूर्तावर स्थापना केली आहे. रायरेश्वर मंदिरात या पक्षाची सुरेश पाटील यांनी केली आहे.

आपल्या विविध मागण्यासाठी मराठा समाजाने‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत लाखोच्या संख्येने शांततेत मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधले होते. मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा दोन महिन्यापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार आज पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाने काहींचा विरोध डावलत अखेर आज महाराष्ट्र क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

Previous articleसरकारची दुष्काळाची घोषणा कागदावरच ; उपाययोजना मात्र शुन्यच : मुंडे
Next article….त्या ऊसतोड मजुराच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडेंनी केले सांत्वन